Beauty Parlour in Pune Under Scanner in NEET Paper Leak Case saam tv
महाराष्ट्र

NEET पेपर विक्रीचं 'ब्युटी पार्लर', पुण्यात घरपोच पेपर पुरवण्याचं रॅकेट

NEET Paper Leak Pune Beauty Parlour Racket Exposed NEET: पेपर फुटीच्या प्रकरणात आता पुणे कनेक्शन समोर आलयं... NEET पेपर विक्रीचा 'ब्युटी पार्लर' पॅटर्न नेमका काय आहे? पुण्यात घरपोच पेपर पुरवण्याचं रॅकेट पोलिसांच्या रडारवर कसं आलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

मेडिकलला प्रवेश पाहिजे? मग नीटचा पेपर घरपोच मिळणार, हो शिक्षणाचं माहेरघरं असलेल्या पुण्यात हा प्रकार सर्रास सुरु असल्याचं पेपरफुटीच्या तपासात समोर आलयं...पुण्यात चक्क एका ब्युटी पार्लरमधून पेपर फुटीचा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आल्यानं एकच खळबळ माजलीय...अहिल्यानगरमधून पोलिसांनी आरोपी धनंजय लोखंडेला ताब्यात घेतल्यानं पेपरफुटीचं पुणे कनेक्शन सीबीआयच्या तपासात समोर आलं...

बिबवेवाडी परिसरातून सीबीआयनं 46 वर्षीय मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतलं... मनीषा वाघमारे व्यवसायाने ब्युटीशियन असून तिचे स्वत:चे ब्युटी पार्लर आहे...तर मनीषाचा पती डेंटिस्ट असून त्याचं पुण्यात क्लिनिक आहे. मनीष वाघमारे ब्युटी पार्लरच्या नावाखाली मेडिकलचे विद्यार्थी हेरण्याचं काम राहुरीतील धनंजय लोंखडेंसाठी करत होती...लोखंडेनं दिलेले पेपर मनीषा विद्यार्थ्यांना घरपोच देत असल्याचाही संशय आहे...या शिवाय मनीष वाघमारेच्या खात्यावर पेपर फुटण्याच्या कालावधीत 21 विविध खात्यातून 10 लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाल्याचंही तपासात उघड आलयं...

पुणे पोलिसांच्या कारवाईत मनीषा वाघमारेचा फोन आणि लॅपटॉप जप्त केल्यानंतर मनीषा आणि लोखंडे यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल्स पोलिसांच्या हाती लागले आणि त्याआधारेच पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आणली... नीट पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रातून 3 जणांना अटक करण्यात आली आहे... सीबीआय आता या सर्व संशयिताच्या खात्यातील आर्थिक व्यवहाराची बारकाईनं चौकशी करतयं...मात्र देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये मनीषा वाघमारेचा नेमका काय रोल होता? तिने महाराष्ट्रातील एकूण किती विद्यार्थ्यांना हे पेपर पुरवले? आणि या ब्युटी पार्लरच्या पडद्यामागे दिल्ली आणि इतर राज्यांमधील कोणते मोठे मासे दडले आहेत? याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाची हळद जीवावर उठली, लग्नाआधीच नवरीचा गेला जीव

Maharashtra News Live Update: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक परिसरात चार तासात दुसरा भीषण अपघात

आरक्षितांना खुल्या प्रवर्गात बंदीला विरोध, राज्य सरकारचा 'समान संधी'चा निर्णय वादात

Bhiwandi Accident : कामावरून परतताना डम्परने उडवले, २ तरुणांचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

Maharashtra Police Officer Transfer: महाराष्ट्र पोलिस दलात बदल्यांचा धडाका, आयपीएस अधिकाऱ्यांसह ४४ पोलिसांच्या बदल्या; वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT