NEET exam mental health crisis saam tv
महाराष्ट्र

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

NEET exam mental health crisis: 'नीट' परिक्षा आता विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढवणारी ठरतेय. पुन्हा एकदा नीट परिक्षेची तयारी करणाऱ्या दोन मुलांनी आपलं जीवन संपवलंय. मात्र या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? मुलांमधला तणाव का वाढतोय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

आई-बाबा मला माफ करा. मी काही करु शकेल असं वाटत नाही. अशी सुसाईड नोट लिहित NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या 16 वर्षांच्या मुलानं आत्महत्या केलीय...ख्वाहिश नांगरे असं त्याचं नाव..गेल्या दीड आठवड्यापासून आपण तणावात असल्याचं त्यानं चिठ्ठीत लिहिलंय. तर दुसरीकडे नागपूरातच NEETच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैदेही उईके या 17 वर्षीय मुलीनंही आपल्या आयुष्याचा दोर कायमचा कापून टोकाचं पाऊल उचललंय.

त्यामुळे नीटच्या धासकीनं पुन्हा एकदा दोन विद्यार्थ्यांचा जीव घेतलाय. दरम्यान महिन्याभरापूर्वी सांगलीतील आटपाडीत नीटच्या सराव परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून साधना भोसले या मुलीच्या मुख्याध्यापक वडिलांनी तिला बेदम मारहाण केली. त्यात साधनाचा दुर्देवी मृत्यू झाला होता..त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये हरवत चाललेला संवाद विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलाय.

नीट किंवा कुठल्याही स्पर्धा परिक्षेचा तणाव असतोच... ताण कमी करण्यासाठी काय करायला हवं? पाहूयात.

विद्यार्थ्यांनो, ताण कसा कमी कराल?

नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा

नकारात्मक विचार टाळा

परीक्षा, अपयश किंवा दबाव हे क्षणिक

एक अपयश तुमचं भविष्य ठरवत नाही

अभ्यासाचे ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा

अभ्यासाचा ताण वाटत असल्यास पालक, शिक्षक, मित्रांशी संवाद साधा

सतत अभ्यास न करता पुरेशी विश्रांती घ्या

ध्यान आणि योगा करा.

मुळात पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांचं ओझं मुलं निमुटपणे खांद्यावर वाहतायत. त्यामुळेच नवनिर्मितीचे अंकुर फुलण्याआधीच कोमेजून जात असल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतयं. शिक्षणाचं ध्येय साध्य करण्यापेक्षा पैसे मिळून देणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी वाढलेली धावाधाव मुलांच्या मानसिक तणावाला कारणीभूत ठरतेय. त्यामुळे साधना, वैदेही आणि ख्वाहिश यांच्या मृत्यूनंतर तरी शिक्षणाचा अर्थ पालकांना उमजेल का? स्पर्धेच्या घोडेबाजारात विद्यार्थ्यांची होरपळ कधी थांबणार? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT