NEET Exam: बुलढाण्यातील परीक्षा केंद्रातील गैरप्रकार CCTVमध्ये कैद  Saam Tv
महाराष्ट्र

NEET Exam: बुलढाण्यातील परीक्षा केंद्रातील गैरप्रकार CCTVमध्ये कैद

वैद्यकीय शिक्षणासाठी महत्वाची मानली जाणारी नीट परीक्षेत (NEET Exam) रविवारी 12 सप्टेंबर रोजी बुलढाण्याच्या एका परीक्षा केंद्रावर (Buldhana Exam Centre) गैरप्रकार समोर आला आहे.

संजय जाधव

बुलढाणा: वैद्यकीय शिक्षणासाठी महत्वाची मानली जाणारी नीट परीक्षेत (NEET Exam) रविवारी 12 सप्टेंबर रोजी बुलढाण्याच्या एका परीक्षा केंद्रावर (Buldhana Exam Centre) गैरप्रकार समोर आला आहे. ऑफलाईन घेण्यात आलेली नीट परीकक्षेची उत्तर पत्रिका नीटची परीक्षा संपल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर तब्बल एक तास परिक्षार्थ्याकडे बाहेर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर माहिती समोर आल्यावर परीक्षा केंद्र असलेल्या जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेने केंद्राबाहेर असलेली उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रात जमा करून सारवासारव केली.

असा प्रकार अनेक उत्तर पत्रिकेबांबतीत झाला तर नाही ना? असा संशय निर्माण होत असल्यामुळे समोर आलेल्या प्रकारामुळे नीट परीक्षेत गुण वाढविण्यासाठी हा गैरप्रकार असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे नीटची परीक्षा देणाऱ्या परिक्षार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला परिक्षार्थ्यांना पहिले नीट परीक्षा देणे बांधकारक आहे.परीक्षेमध्ये चांगले गुण मिळविणाऱ्या परिक्षार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेता येतो. विशेष म्हणजे परीक्षेत मेरिट गुण प्राप्त करणाऱ्यांना सरकारी कोट्यामधून निशुल्क आणि काही शुल्क भरून वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण प्राप्त करता येते. त्यानंतरव संपूर्ण वैद्यकीय शिक्षणानंतर वैद्यकीय अधिकारी पदवी प्राप्त करता येते. नीट परीक्षा केंद्र सरकारकडून घेण्यात येते. ही परीक्षा अत्यंत महत्वाची असून परिक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर कडक नियमावली देण्यात येते. व या नियमांचे काटेकोरपणे अमलबजावणी करणे परीक्षा केंद्र असलेल्या शाळेंना बंधनकारक असते.

" परीक्षा केंद्रा बाहेर गेलेल्या उत्तर पत्रिकेची चौकशी होणे गरजेची "

रविवारी 12 सप्टेंबर रोजी देशासह राज्यात विविध परीक्षा केंद्रांवर एकाच दिवशी, एकाच वेळी ऑफलाईन नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यात देखील नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या. सदर परीक्षा केंद्रावर काटेकोरपणे नियमावली जाहीर करून कुठल्याच प्रकारचा गोधळ किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी दक्षता ठेवण्याचे आदेश होते. बुलडाणा शहरात देखील सहकार विद्या मंदिर, श्री शिवाजी विद्यालय आणि जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्यापरीक्षा केंद्रावर नीटच्या परीक्षा घेण्यात आल्या.

जांभरुळ येथील तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावर 1 पासून 12 खोल्यात 120 परिक्षार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. संध्याकाळी 5 वाजेला परीक्षा संपल्यावर खोली क्र.9 मधील एका परिक्षार्थ्याची उत्तर पत्रिका केंद्रा बाहेर गेली. असा प्रकार समोर आल्यानंतर याबाबतची माहिती विचारल्यावर तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरील उपस्थित केंद्रप्रमुख व कर्मचाऱ्यांनी सारवासारव करून तब्बल एका तासानंतर उत्तर पत्रिका परीक्षा केंद्रावर जमा केली. यावेळी हा सर्व प्रकार कॅमरात कैद झाला, तब्बल एक तास नीट परीक्षेची उत्तर पत्रिका बाहेर असल्यामुळे असा प्रकार अशा अनेक उत्तर पत्रिकेबाबतीत झाला असावा तर नाही ना? असा संशय निर्माण होत असल्यामुळे समोर आलेल्या प्रकारामुळे नीट परीक्षेत गुण वाढविण्यासाठी हा गैरप्रकार असल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे या अशा गैरप्रकराची चौकशी होणे गरजेचे आहे.

" ती उत्तर पत्रिका नव्हे तर उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी "

तोमई इंग्लिश शाळेच्या परीक्षा केंद्रावरून नीटची उत्तर पत्रिका एक तास केंद्रा बाहेर गेली असल्याबाबत विचारल्यावर, परीक्षा सुटल्यावर एका चांडोलच्या परिक्षार्थ्यांने चुकीने जी शाळेत जमा असते ती उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी सोबत नेली होती. ती त्याच्याकडून जमा करण्यात आली आहे. आणि जी कॉपी जमा करण्यात आली आहे. ती नीटची ओरिजनल उत्तर पत्रिका नव्हती तर उत्तर पत्रिकेची कार्बन कॉपी होती अशी कबुली तोमई इंग्लिश शाळेचे परीक्षा केंद्र प्रमुख अजय जवंजाळ यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT