राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक

राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कोरोनासंबंधीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत मोठी गर्दी जमली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) शहर कार्यालयाच्या उदघाटन समारंभ होता, या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीला जबाबदार धरून प्रशांत जगताप, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, माजी नगरसेवक निलेश निकम यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळील धनश्री अपार्टमेंट याठिकाणी राष्ट्रवादीचे नवे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंजीआय जमेलेल्या गर्दीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सार्वजनिक कार्यक्रमासाठी 50 व्यक्तीची मर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी कोरोनासंबंधीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करत मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमाला 400-500 नागरिक जमले होते. यातील अनेक जणांनी मास्क लावला नव्हता. सोशल डिस्टसिंगचे तर तीन तेरा वाजले होते. ही गर्दी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नाराजी व्यक्त केली. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांनाही चांगलेच सुनावले. तर नगरिकांनीही राजकीय कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला.

त्यानंतर आज पोलिसांनी या गर्दीचे फोटो व व्हिडीओ तपासून जगताप, प्रदीप देशमुख, निलेश निकम यांच्यासह सुमारे दीडशे जणांच्या विरोधात बेकायदा गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला . त्यानंतर पुढील कारवाई करत शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र प्रशांत जगताप यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा जामीनपात्र असल्याने केवळ दोन तासातच त्यांना जमीन मिळाला आणि त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलीमा पवार यांनी दिली.

Edited By- Anuradha Dhawade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाडेकरूंची माहिती लपवणं पडलं महागात; पुणे शहरातील ७६ घरमालक आणि ‘पीजी’ चालकांवर गुन्हे दाखल

Maharashtra News Live Update: Dhule: अक्कलपाडा जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती, लाखो लिटर पाणी वाया

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT