Ajit pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit pawar : 288 जागांचा सर्व्हे करणार? आमदार परत गेले तर नव्यांना संधी देऊ; विधानसभेसाठी अजित पवारांची तयारी सुरू

Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्व्हे करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट कामाला लागला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पावर यांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्व्हे करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 54 जागा मिळाल्या होत्या आणि त्या जागा राष्ट्रवादीकडे राहणार आहेत. या सर्व्हेत 288 जागांमध्ये ज्या ठिकाणी राज्यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असतील, त्या जागांवर दावा करण्यात येणार आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी साम टीव्हीसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ही माहिती दिली आहे.

पक्ष सोडून जाण्याचा जे आमदार विचार करत आहेत, त्यांना अजित पवार यांनी इशारा दिला आहे. जे पक्ष सोडून जातील त्यांच्या जागी नवी टीम तयार करणार, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

याचबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, ''प्रत्येकजण आता आपापल्या परीने सर्व्हे करतील. तिघांचे सर्व्हे (महायुती) समोर ठेवले जातील. जे दोन सर्व्हे एका बाजूला ठेवले जातील, त्याला ती जागा मिळणार.''

दरम्यान, प्रफुल्ल पटेल अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले आहेत की, ''अजित पवारांची राष्ट्रवादी 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादीनं जिंकलेल्या 54 जागा राष्ट्रवादीकडेच असणार आहेत. सर्व्हेमध्ये ज्या जागांवर उमेदवार आघाडीवर असेल त्या जागांवर दावा करणार आहे.''

अजित पावर काय म्हणाले?

यावरच अजित पवार म्हणाले आहेत की, ''आमदार परत गेले तर नव्यांना संधी देऊ. दुसरी माणसं तयार करू. आमच्याकडे अनेक नवीन उमेदवार आहेत. रायगडमध्ये भाजपची मतं आम्हाला मिळाली आहेत. मतं ट्रान्सफर होत नाही म्हणणं चुकीचं.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT