NCP Saam Tv News
महाराष्ट्र

सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लक्षवेधी "एप्रिल फुल" आंदोलन

पेट्रोल पंपावर प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून " एप्रिल फुल " केले आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर: सोलापुरात राष्ट्रवादी (NCP) युवक काँग्रेसने महागाई विरोधात एक आगळ वेगळे आंदोलन केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल (Petrol) पंपावर प्रतिकात्मक स्वरुपात जनतेला कमळाची फुले वाटप करून " एप्रिल फुल " केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला निषेधाचा केक कापून आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.

राष्ट्रवादी (NCP) युवकचे सोलापूर (Solapur) शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट रोडवरील पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी आलेल्या वाहधारकांना कमळाचे प्रतिकात्मक फुल देऊन निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

कमल का फुल, एप्रिल फुल, मोदी सरकार (Modi Government) हाय हाय,एक ही भूल, कमल का फुल, महागाई कमी करण्यात अपयशी ठरलेल्या भाजप सरकारचा धिक्कार असो, देशाचे वाटोळे करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, पेट्रोल शंभरी पार, मोदी सरकार खुशाल यार, सामान्य जनतेला बेकारीच्या खाईत लोटणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत.

आजपासून काँग्रेसही (Congress) राज्यात आंदोलन सुरु करणार आहे. काँग्रेस तालुका, जिल्हा पातळीवर भाजप (BJP) विरोधात आंदोलन करणार आहे. हे आंदोलन 1 ते 7 एप्रिल चालणार आहे. देशात पुन्हा इंधन दरवाढ सुरु झाली आहे. या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

Maharashtra News Live Update: राज्यात दुष्काळाने शेतकरी बेहाल, मंत्रालयात कोट्यावधींची उधळपट्टी

Deep Depression Storm : बंगालच्या उपसागरात 'डीप डिप्रेशनची' तीव्रता वाढली, 'या' राज्यात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT