Maharashtra Politics| Sharad Pawar News Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: शरद पवारांचं ठरलं! रायगडावरुन वाजणार लोकसभेची 'तुतारी'; नव्या चिन्हाच्या लॉन्चिंगसाठी खास सोहळा

Gangappa Pujari

NCP Sharadchandra Pawar News:

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळाले. काल निवडणूक आयोगाने त्यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हही देण्यात आले आहे. नवे चिन्ह घेऊन निवडणुकांच्या रणांगणात उतरण्याचे मोठे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. या नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी शरद पवार गटाकडून खास सोहळा आयोजित करण्यात आला असून रायगडावरुन शरद पवार गट लोकसभा निवडणुकांची तुतारी फुंकणार आहे.

रायगडावरुन वाजणार लोकसभेची तुतारी!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (NCP SharadChandra Pawar) गटाकडून नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी उद्या खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचे लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे.

उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. नव्या चिन्हाच्या प्रमोशनसाठी (New Party Symbol) या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नव्या चिन्हावर पहिली प्रतिक्रिया...

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच 'तुतारी' आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार'साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच 'तुतारी' पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे! (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT