Sharad Pawar Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Political News : '१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण...', अजित पवारांच्या पत्राला शरद पवार गटाचं जोरदार उत्तर

Sharad Pawar Vs Ajit Pawar : १०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन १०० दिवसू पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील जनतेशी पत्राद्वारे संवाद साधला. या पत्रात अजित पवार यांनी स्वत:चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. या पत्राला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे. १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण, अशी टीका शरद पवार गटाने अजित पवारांवर केली आहे.

शरद पवार गटाने १०० दिवसांत काय-काय झालं अशी सविस्तर पोस्ट X अकाउंटवर शेअर केली आहे. शरद पवार गटाने पोस्टमध्ये म्हटलं की, "१०० दिवस छत्रपती - फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे, १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे."  (Latest Marathi News)

"१०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्याा महाराष्ट्रविरोधकांसोबतचे, १०० दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे."

"१०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात."

"कितीही मोठं संकट आलं तरी, विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांमध्येच आहे", अशी पोस्ट राष्ट्रवादीने शेअर केली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

AUS vs PAK: बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये विराटला सोडलं मागे

Maharashtra News Live Updates: सोलापुरात आदिवासी भटके विमुक्त समाजाकडून भाजप उमेदवाराला पाठिंबा

SCROLL FOR NEXT