Dr-Bharat Chavan With Sharad Pawar In Aeroplane
Dr-Bharat Chavan With Sharad Pawar In Aeroplane Facebook/@Dr-Bharat Chavan
महाराष्ट्र

Sharad Pawar : माणसातल्या विठ्ठलाचे दर्शन झाले; पवारांसोबत विमानातून प्रवास केल्यानंतर कार्यकर्त्याची भावना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत अनेक किस्से प्रचलीत आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळणे, त्यांची विचारपूस करणे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे अशाप्रकारे काम करण्याची शरद पवारांची शैली आहे. औरंगाबादच्या (Aurangabad) एका तरुणाला असाच प्रत्यय आला आहे. काही कामानिमित्त शरद पवारांना औरंगाबादहून बारामतीला आलेल्या तरुणाला परतीचा प्रवास थेट शरद पवारांसोबत करण्याची संधी मिळाली आहे, तेही विमानातून! डॉ. भारत चव्हाण असं त्याचं नाव असून ते सरपंच आहे. तसेच अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी पक्षासाठी काम करतायत. आपला अनुभव त्यांनी फेसबुकवर मांडला आहे. (Sharad Pawar Latest News)

हे देखील पाहा -

डॉ. भारत चव्हाण यांनी आपल्या फेसबुक वॉलवर शरद पवारांसोबतचे फोटोज शेयर करत आपल्या अनुभवाबद्दल सविस्तर लिहीलं आहे. त्यांच्या अनुभवाबद्दल त्यांनी लिहीलं की, राजकारणाची कोणतीही पार्श्वभुमी नसलेल्या माझ्यासारख्या सर्वसामान्य तरुणाला शरद पवार साहेब जेव्हा विमानातुन स्वत:सोबत औरंगाबादला घेऊन जातात. हल्ली राजकारणात आपण पाहतो की राजकीय नेते जेंव्हा सर्वसामान्य लोकांना ऐकुण घेयला व भेटायला ही कंटाळा करतात त्यांच्या समस्या तर बाजूलाच राहिल्या पन भेटण्याच्याही सीमा ठरवतात तेव्हा एका सर्वसामान्य घरातून येणारा माझ्यासारखा तरुण म्हणून जेव्हा माझ्या काही अडचणी व प्रश्न खासदार शरद पवारसाहेबांना भेटून त्यांच्या कानावर घालावं म्हणून पवारसाहेबांना भेटण्यासाठी मी काल रात्री औरंगाबाद वरून बारामती गाठली.

बारामतीचे नितीनदादा यादव यांच्या मदतीने तिथे पोहचल्यावर थांबण्याची व्यवस्था झाली व साहेबांची भेटीचीही वेळ मिळाली. अंघोळ वगैरे करून सकाळी गोविंदबाग येथे साहेबांना भेटण्यासाठी उपस्थित राहिलो. साहेबांना भेटायला अनेक बाहेरगावावरून व स्थानिक पदाधिकारी मातब्बर नेते आले होते. मला साहेबांना भेटण्यासाठी आवाज देण्यात आला, आत गेल्याबरोबर रात्रभर प्रवास करून थकलेला चेहरा पाहून साहेबांनी विचारलं कुठून आलात ? मी औरंगाबादहुन असे उत्तर दिलं मगसाहेबांनी अडचणी काय आहेत वगैरे विचारल्या समजून घेतल्या मला खरंच खूप नवल वाटत होतं इतक्या उंचीचा नेता इतक्या आपुलकीने मी कुठला कोण पन माझे सर्व प्रश्न ऐकुण घेत होते, माझे पूर्ण बोलणं झाल्यावर साहेब स्मितहास्य करीत म्हणाले ठीक आहे बघतो मी काळजी करू नका! मी धन्यवाद साहेब म्हणत बाहेर पडणार तोच साहेबांनी पुन्हा आवाज दिला अन विचारले औरंगाबादवरून आला आहात ना परत कधी जाणार आहात?मी म्हटलं साहेब आता निघेल ! साहेब बोलले थांबा मी पण आज औरंगाबादलाच जातो आहे.तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत !

हे शब्द ऐकुण मी स्वप्नात तर नाही ना असे मला राहुन राहुन वाटत होते.तितक्यात साहेबांनीच पुन्हा मला सांगितलं सोबतच जाऊयात. मग बाहेर साहेबांचे पीएस तथा उपजिल्हाधिकारी श्री. सतीश राउत यांना फोनवरुन मला सोबत घेण्याचे निर्देश दिले.त्यांच्याकडे गेल्यावर तेही बोलले साहेबांचा निरोप आहे, थांबा निघुयात आपण !

एका छोट्या मोठ्या पदावरुनही हवेत जाणारे व सर्वसामान्य लोकांना कुठलीच किंमत न देणारे नेते पुढारी अनेकदा अनुभवले पन याचीच दुसरी बाजु सामान्य लोकांना आपलं समजून आपलंसं करणारे पवारसाहेब माझ्या प्रत्यक्ष नजरेतून आभाळाएवढया मोठ्या मनाचे आणि त्याहीपेक्षा जास्त उंचीचे प्रेमळ नेते आहेत इतकंच सांगू शकतो. माझ्यासारख्या एका तरुणासोबत शेती, राजकारण, समाजकारण,माझे कुटुंबातील लोक या व असंख्य विषयावर साहेबांनी विमानात त्यांच्या शेजारच्या सीटवर सोबत बसवुन चर्चा केली.म्हणुन तर साहेबांसोबत विमान प्रवास करताना अनेकदा डोळे भरुन येत होते अन राहुन राहुन वाटत होते,यामुळेच का काय, पवारसाहेब सर्वांचेच “साहेब” आहेत. असा सविस्तर अनुभव त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून मांडला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: २४७५ अधिकारी, २२१०० अंमलदार आणि ६२०० होमगार्ड; मतदानासाठी मुंबई पोलीस सज्ज

Sanjay Raut News: संजय राऊत यांच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर रोडवरील भलं मोठं होर्डिंग कोसळलं; अनेक वाहनांसह घोडा अडकला

Maharashtra Rain News : राज्यात आजही अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचा तडाखा; केळीच्या बागा भूईसपाट, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

SCROLL FOR NEXT