Maharashtra Political Storm, Ajit Pawar and Sharad Pawar SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar News: राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह माझ्याकडे आहे; अजित पवारांच्या दाव्यानं आणखी मोठा राजकीय भूकंप!

Gangappa Pujari

Ajit Pawar News in Marathi: राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांपैकी ३० आमदार अजित पवारांसह राजभवनात हजर होते. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि इतर ९ आमदारही मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला आहे. (Maharashtra Political News)

काय म्हणाले अजित पवार...

या निर्णयावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी "महाराष्ट्राचा विकास करणे, जनता समाधानी कशी राहील, त्या सर्व घटकांना मदत करण्यासाठी हा निर्णय़ घेतला. हा निर्णय घेतला असताना बहुतेक आमदारांना हा निर्णय मान्य आहे, असे ते म्हणाले आहेत.

तसेच त्यांनी पक्षाबद्दल बोलताना "पक्ष सगळा याबरोबरच आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सरकारमध्ये सामील झालो. यानंतरच्या सर्व निवडणुका.. पक्षाचे चिन्ह नाव आहे. त्याच नावाखाली चिन्हाखाली निवडणुका लढवणार ...त्यातून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत; असे म्हणत थेट शरद पवारांना (Sharad Pawar) आव्हान दिले आहे.

CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....

दरम्यान, या सर्व राजकीय घडामोडीवर बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजिन सरकारला विकासाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी साथ दिली आहे. अजित पवार यांनी विकासाचे राजकारण केले असून काम करणाऱ्या नेत्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जाते तेव्हा अशा घटना घडतात;" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Mahayuti News : महायुतीच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला, 40 उमेदवारांची घोषणा?

SCROLL FOR NEXT