Amol Kolhe SaamTV
महाराष्ट्र

'मी शेतकऱ्याचा पोरगा, उगाच...'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अमोल कोल्हे स्पष्टच बोलले

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देऊन पूर्णविराम दिला आहे. '

रोहिदास गाडगे

Amol Kolhe news : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देऊन पूर्णविराम दिला आहे. 'मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. उगाच आऊत खांद्यावर घेऊन आम्ही फिरत नाही तर वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचं हे आम्ही ठरवत असतो, असं म्हणत कोल्हेंनी भाजपा प्रवेशावरुन सूचक वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पक्षाच्या स्टार प्रचारक यादीतून त्यांचं नाव वगळण्यात आलं. त्यामुळे अमोल कोल्हे नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात पसरली होती तसेच अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आलबेल नसल्याची देखील चर्चा होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. ही भेट देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खुपली होती. तर भाजप कार्यकर्ते मात्र अमोल कोल्हे यांचं स्वागत करत होते. त्यामुळे खासदार कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं. मात्र, कोल्हे यांनी भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

'नाराजी आणि पक्षातराची पेरणी बंद करा ,अशा शब्दात शिरूर लोकसभा मतदार संघांचे राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विरोधकांना खडसावलं.

तसेच भाजपचे केंद्रीयमंत्री रेणुका सिंग यांनी शिरूर लोकसभा भाजप लढवणार असल्याचं विधान केल्यानंतर खासदार कोल्हे यांनी आपण रेणुका सिंग यांच्या वक्तव्याला सकारात्मक पद्धतीने घेतो, असं म्हणत आपल्या शैलीत पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LICची मोठी घोषणा! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी, १७ सप्टेंबरपर्यंत मिळणार विशेष सवलती

Online Gaming Regulation Bill: संसार उद्धवस्त करणाऱ्या 'ऑनलाइन जुगारा'वर लगाम; ऑनलाइन गेमिंग विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर

निवडणुकीत ठाकरेंचा पराभव, एकनाथ शिंदे म्हणाले... | VIDEO

Khandeshi Puranpoli Recipe : खानदेशी पुरणपोळी 'मांडे', बैलपोळ्यासाठी खास गोड पदार्थ

Sprouts Curry : पावसाळ्यात भाजी कोणती करावी सुचत नाही? बनवा मिक्स कडधान्याची उसळ

SCROLL FOR NEXT