Amol Kolhe-Gautami Patil
Amol Kolhe-Gautami Patil Saam TV
महाराष्ट्र

Amol Kolhe On Gautami Patil: गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादात खासदार अमोल कोल्हेंची उडी; म्हणाले...

रोहिदास गाडगे

Pune News : गौतमी पाटीलचं नाव घराघरात पोहोचलं आहे. मात्र तिच्यानावावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचं खरं आडनाव पाटील नसून चाबूकस्वार असल्याचा मुद्दा उपस्थित करत पाटील आडनाव वापरुन ती पाटलांची बदनामी करत आहे, असं मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी म्हटलं होतं.

...तर कलाकार तणावात जातो

मात्र आडनावावरुन कलाकाराची कुचबंना होऊ नये, असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. कलाकाराचं ट्रोल होणं त्या कलाकाराला तणावात घेऊन जातं. त्याला आता गौतमी अपवाद नसतील.

त्यामुळे गौतमी स्वत:च्या कर्तृत्वावर लोकप्रिय झालीय. तिच्या त्या कलेचा आदर व्हायला हवा, असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी गौतमी पाटीलला कलाकार म्हणून समर्थन दिलं आहे.

लोकांनी गौतमीची कला डोक्यावर घेतली

ग्रामीण महाराष्ट्रातल्या तरुणांनी गौतमीची कला डोक्यावर घेतली आहे. हे यश तिने तिच्या कर्तृत्वाच्या लोकप्रियतेतून मिळवलं आहे. एक काळ असाही होता तिला दोनवेळच्या जेवनासाठी संघर्ष करावा लागला.

या संघर्षाच्या काळात आज बोलणाऱ्यांनी जेवन दिलं नाही. त्यामुळे केवळ आडनावावरुन एका कलाकाराची कुचबंना होऊ नये, असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी गौतमीला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. (Latest News Update)

गौतमीच्या आडनावाविषयी काहीही माहिती नाही. पण कलाकाराच्या नाव आडनावापेक्षा त्याची कला महत्वाची असते. उद्या गौतमीचं नाव जरी बदललं तरी तिची कला आणि लोकप्रियता तिच राहणार आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

फक्त 57 मिनिटात होते फुल चार्ज, एका चार्जमध्ये देते 320 Km ची रेंज; जबरदस्त आहे Citroen ची ही स्वस्त इलेक्ट्रिक कार

SCROLL FOR NEXT