Eknath Khadse saam Tv
महाराष्ट्र

Eknath khadse News: गिरीश महाजन यांनीही इतरांना संधी द्यावी - एकनाथ खडसेंचा चिमटा

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमधील घराणेशाहीचे उदाहरणं दाखवून गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath khadse Critizied Girish Mahajan:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमधील घराणेशाहीचे उदाहरणं दाखवून गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना एकच घरात सर्व पदे पाहिजे, कुटुंबापुरताच त्यांचा पक्ष आहे, अशी टीका केली होती. यावर एकनाथ खडसे यांनी खोचक टीका करत प्रत्युत्तर दिलं. महाजन यांच्या घरात ३० वर्षांपासून नगराध्यक्ष आणि आमदारकीचं पद आहे. इतकेच काय भाजपमध्ये अनेक अशी उदाहरणे आहेत.

ज्यात एकाच घरात अनेक पदे असल्याचं खडसे म्हणाले. गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या सरपंचनंतर जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष झाल्या. गिरीश महाजन हे स्वतः गेल्या २० वर्षांपासून आमदार आहेत. मग त्यांनीही इतरांना संधी द्यावी, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.

भाजपमध्ये एकच घरात पदे असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यात गावीत असतील, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, याचे उदाहरणं सर्वांना माहिती आहेत. हे गिरीश महाजन यांना दिसत नाही का? गिरीश भाऊंना आपल्या घरात आमदारकी आणि नगराध्यक्ष पाहिजे, त्यामुळे गिरीश भाऊंनी याचे उत्तर दिले पाहिजे, असे सुद्धा खडसे म्हणाले. भाजपचे संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांना ओळखलं जातं. यावरुनही एकनाथ खडसेंनी त्यांचा चिमटा काढला.

संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी केले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. धनगर आरक्षणातही गिरीश भाऊंनी मध्यस्थी केली मात्र तो सुद्धा प्रश्न सुटलेला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळालेला नाही, अशी खोचक टीका एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT