NCP MLA Disqualification Verdict Saam Tv
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची आज सुनावणी; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय बदलणार का? सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

NCP MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २९ जुलै २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. आजच्या सुनावणीत कोर्ट काय निर्देश देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.

अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र करायला पाहिजे अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पिठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सविस्तर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत तरी कोर्ट काही महत्वाचे दिशानिर्देश देत का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणेच शिवसेना पक्षाचीही आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा या सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पार पडली नाही. आता सप्टेंबर महिन्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT