Chief Minister Devendra Fadnavis’ Delhi visit sparks fresh speculation over a possible NCP merger. Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचं विलिनीकरण दिल्लीत ठरणार? फडणवीसांचा दिल्ली दौरा, चर्चांना उधाण

Ncp Merger Decision Delhi Fadnavis Visit: राष्ट्रवादीचं विलिनीकरण दिल्लीत ठरणार असल्याची चर्चा रंगलीय.. मात्र त्यामागची कारणं काय आहेत ? मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात नेमकं काय घडलं?

Bharat Mohalkar

अजित पवारांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला... मात्र आता राष्ट्रवादी विलिनीकरणाचा निर्णय राज्यात नाही तर थेट दिल्लीत होणार असल्याची चर्चा रंगलीय... आणि त्याला कारण ठरलंय... जिल्हा परिषदेच्या निकालानंतर भाजपच्या सुरु झालेल्या जोर बैठका...कारण झेडपीचा निकाल लागताच मुख्यमंत्री फडणवीसांनी अचानक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत विलिनीकरणावर चर्चा केली, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली?

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राजकीय पोकळी निर्माण झालीय.. एवढंच नाही तर दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरत आहेत... त्यातच आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून बैठकांचा सिलसिला सुरु झालाय.. त्यामुळे जर राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपची संभाव्य रणनीती काय असेल? यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..

आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही... तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर आहेत... मात्र दिल्ली दौऱ्याआधी सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळे, शरद पवारांची भेट घेतली.. त्यानंतर सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.. आणि हीच संधी साधून राऊतांनी खोचक टोला लगावलाय... दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात दादांनी आम्हाला सांगितलं असं थेट विधान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता मात्र या चर्चेपासून हात झटकलेत..

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेदरम्यान आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत.. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार या दिल्लीच्या आदेशाने करणार की स्वाभिमानी बाणा दाखवत कुटुंब आणि पक्षातील नेत्यांच्या संमतीने घेणार... याकडे देशाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोर बनतायत लुटीचं केंद्र, कंपन्यांच्या डिस्काऊंटपासून रुग्ण वंचित

Shocking: प्रसिद्ध बॉडीबिल्डरची आत्महत्या, जिममध्ये येणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध; नंतर...

Nashik Conversion Case: नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद; TCS ने घेतली गंभीर दखल, VIDEO

लातूरमध्ये शिक्षणसम्राटांकडून पालकांची लूट, 'साम टीव्ही'चं ऑपरेशन शिक्षण माफिया

पगारवाढीसाठी कंपनीत दंगल, कंपनीवर 'डबल गेम'चा आरोप

SCROLL FOR NEXT