NCP Lok Sabha Seat and Candidates Details Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Election 2024: राष्ट्रवादी पवार गटाच्या सहा जागा निश्चित; कोणत्या जागेवर कोण लढणार निवडणूक? जाणून घ्या

Sandeep Gawade

Maharashtra Election 2024 NCP Candidates

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी सहा जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. बारामती, सातारा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण या जागावर पवार गट लढवण्याची शक्यता आहे. या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेर - एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारा - श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले होते शरद पवार?

जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा आमचा प्रयत्न राहीलं. राज्यात शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि संभाजी राजे यांना घेवून निवडणुकीला सामोरं जाणार आहे. एक दोन जागांचा तिढा आहे, त्या पार्श्वभूमीनर जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर, संभाजी राजे यांच्या पक्षाला काही जागा सोडण्यासांदर्भात विचार सुरू असल्याची माहिती शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे

प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावं ही आमची इच्छा आहे, असं पवार म्हणाले होते. तसेच त्यांच्या तक्रारी असतील, तर त्या सामंजस्याने सोडवल्या जातील. प्रकाश आंबेडकर यांना जागा सोडण्याबाबत माझ्यासमोर चर्चा झाली आहे. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे जे मुद्दे मांडले त्यात घराणेशाहीचा मुद्दा नाही. नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे आहे.

दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडे

नाशिकच्या जागेसाठी माझ्या पक्षातील लोक देखील इच्छुक आहेत, त्यात वावग काही नाही. मात्र मी त्यांना समजावून सांगितलं. दिंडोरीची जागा आमच्याकडे (राष्ट्रवादी शरद पवार गट) राहणार आहे. माकपसाठी विधानसभेसाठी जागा सोडण्याची तयारी आहे, मात्र त्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून आम्हाला मदत केली पाहिजे. शिक्षक भास्कर भगरे शरद पवार गटाचे दिंडोरीचे उमेदवार असावेत, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचं शरद पवार यांनी नाशिकमध्ये म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक अमित शहांच्या भेटीला

Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावास्येला करू नका 'या' चुका; वर्षभराच्या आत भोगावे लागतील गंभीर परिणाम

Bigg Boss Marathi : 'फिनाले तिकीट घेऊन फक्त खुश रहा, ट्रॉफी तर...' बिग बॉसच्या माजी स्पर्धकाने निक्कीला झापले!

Viral News: दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! तरुणांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, VIDEO पाहून अनेकांचा संताप

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींना १० ऑक्टोबरला मिळणार ३००० रुपये; कसं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT