Supriya Sule News Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News: 'चांगला कष्ट करणारा नेता...'; अजित पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवार यांनी दिवसभरातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच चर्चेवर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Supriya Sule News: राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमित शाह यांची गुप्त भेट घेतली अशी चर्चा आहे. या वृत्तावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यात आज अजित पवार यांनी दिवसभरातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तुमच्या चॅनेलला मविआ कार्यक्रमात दाखवले. तुम्ही सगळ्यांनी एक-एक युनिट लावा, राज्यात अनेक प्रश्न आहेत. राज्यात चुकीचं काम होतंय. एक कार्यक्रम रद्द केल्याने असं काही होत नाही'.

'अनेक बैठका होतात, मला माहिती नाही. तुम्ही कुठल्या बैठकीबद्दल बोलत आहात. सगळ्यात जास्त केसेस विरोधी पक्षावर झाल्यात. त्याच्यावर आरोप होतात ते भाजपमध्ये जातात. 110 वेळा अनिल देशमुख यांच्या घरावर रेड झाली, पण काही सापडलं नाही, असेही सुळे म्हणाल्या.

'दादाला विचारा, मला गॉसिपला वेळ नाही. लोकप्रतिनिधी म्हणून अनेक काम आहेत. त्यामुळे मला माहिती नाही. चांगला कष्ट करणारा नेता असेल तर सर्वांना हवा असतो, तसे अजितदादा हवे असतात, त्यामुळे अशी वक्तव्य केली जातात, असेही त्या म्हणाल्या.

...अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही: शरद पवार

पुलवामावरून शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. शरद पवार यांनी सांगितले की, 'पुलवामामध्ये जवानाची हत्या कशामुळे झाली. त्या ठिकाणी असणाऱ्या राज्यपाल मलिक त्याची नियुक्ती भाजपने केली होती. जवानांना हवं ते साधन न मिळाल्याने त्याचा जीव गेला असे मलिकांनी सांगितले. त्यांनी देशाच्या वरिष्ठांना हे सांगितले. पण त्यांनी न बोलण्यासाठी त्यांना सागितले. त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही.' असे परखड मत शरद पवार यांनी मांडले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT