Sumedh Shyamkunwar
Sumedh Shyamkunwar Saam Tv
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

अभिजीत घोरमारे

भंडारा - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्हात अडकलेल्या राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याने काल रात्री उशिरा अखेर भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील आंधळगाव पोलिसात (Police) आत्मसमर्पण केले. सुमेध श्यामकुवर असे आरोपी नेत्याचे नाव आहे. शरणागती पत्करल्यानंतर आंधळगाव पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करत रात्री उशिरा त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. आज सुमेध श्यामकुवर यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. आरोपी सुमेध श्यामकुवर हे अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठात फेऱ्या मारत होते. मात्र त्यांचा जामीन अर्ज रद्द झाला. त्यानंतर सुमेध श्यामकुवर यांनी अखेर आंधळगाव पोलिसांना आत्मसमर्पित केले आहे.

हे देखील पहा -

भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. सुमेध श्यामकुवर यांनी मुलीला हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली कार थांबून या मुलीचा विनयभंग केला. ही संतापजनक घटना 25 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती.

फिर्यादीच्या तक्रारीवरून 26 फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला सुमेध शमकुवर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांची गाडी आंधळगाव पोलिसांनी भंडारा येथून जप्त केली. पीडित मुलगीही तुमसर तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ती भंडारा येथील शाळेत दहावीत शिकत होती. तर आरोपी सुमित श्यामकुवर यांचे भंडारा शहरात राजीव गांधी चौकात यशोधन ग्रामीण शिक्षण संस्थाद्वारा संचालित महिला समाज मुलीचे वसतिगृहात वास्तव्यास होती.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime: सिने स्टाईल थरार! दुकानातून बाहेर पडताच अडवलं, गाडीत टाकलं, अन्.. प्रसिद्ध व्यावसायिकाचे अपहरण; अकोल्यात खळबळ

Nanded News | नांदेडमध्ये 170 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त? आयकर विभागाची कारवाई

Petrol Diesl Rate (14th May 2024): मेगा सिटीमध्ये पेट्रोल डिझेल महाग की स्वस्त ;जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Blood Pressure: उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी चहा प्यावा की नाही?

Today's Marathi News Live : पुण्यात मतदानादरम्यान 57 ईव्हीएम मशीन बदलले

SCROLL FOR NEXT