Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad Pawar Saam tv
महाराष्ट्र

Political News: संजय राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर शरद पवारांनी दिलं असं उत्तर म्हणाले, 'मी…'

Shivani Tichkule

Sharad Pawar on Sanajy Raut: शुक्रवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत संजय राऊतांना खासदार श्रीकांत शिंदेंविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी श्रीकांत शिंदेंचे नाव ऐकताच राऊतांनी थुंकलं होतं. त्यांचा ऑन कॅमेरा थुंकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृत्यावरून राज्याचं राजकारण तापलेलं दिसत आहे. या वादानंतर संजय राऊतांनी जीभेचा त्रास असल्याचं सांगत त्यावर स्पष्टीकरणही दिलं.  (Latest Marathi News)

मात्र, त्यानंतरही त्याचे राज्यभर पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत. या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेनंतर माध्यमांशी बोलत होते. (Latest Political News)

संजय राऊत थुंकल्याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, “हे काही राष्ट्राचे, राज्याचे प्रश्न नाहीत. मी त्यावर भाष्यदेखील करू इच्छित नाही आणि त्याला महत्त्वही देऊ इच्छित नाही.

नेमकं काय घडलं?

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारल्यार ते थुंकल्याने वाद निर्माण झाला आहे. यावर अजित पवार यांनी प्रत्येकानं तारतम्य ठेवून वागावं असा सल्ला राऊतांना दिला होता. अजित पवारांच्या सल्ल्यानंतर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत धरणामध्ये **** पेक्षा थुंकणं कधी चांगलं, असं म्हटलं होतं. (Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

Patients Relatives Beaten Nurse: वॉर्डमधून बाहेर काढल्याने राग आला; रुग्णासहित नातवाईकांकडून नर्सला मारहाण

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT