maharashtra political news  saam tv
महाराष्ट्र

राज्यात पुन्हा भीमशक्ती-शिवशक्ती प्रयोग होणार? ठाकरे-आंबेडकर यांची बैठक संपली,राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,माजी मंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Rajesh Tope News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या बैठक झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक संपन्न झाली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,माजी मंत्री राजेश टोपे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

अमरावती येथे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी नव्या राजकीय समीकरणाच्या चर्चेवर महत्वाचं विधान केलं आहे.

'महाविकास आघाडी सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं, यावेळी प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे, अशी पहिली प्रतिक्रिया माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राजेश टोपे पुढे म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून यावं आणि आणखी महाविकास आघाडी घट्ट व्हावी यासाठी राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस एकत्र चर्चा देखील करतील'.

'वंचित आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) महाविकास आघाडीचे नेत्यांची चर्चा करून अधिकृतरित्या महाविकास आघाडी या निमित्ताने घट्ट करतील, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामील होणार का ?

दरम्यान, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत असल्याने ठाकरे गट महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांशी चर्चा करणार आहे. यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार की नाही याबाबतीत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र ही युती कशी असेल? महाविकास आघाडीत चार प्रमुख पक्ष दिसतील का? याबाबत कोणतीही स्पष्टता अजून आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT