Nawab Malik Saam TV
महाराष्ट्र

Nawab Malik: कारागृहातील मुक्काम वाढला! नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ, मुंबई सत्र न्यायालयाचे निर्देश

माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांंच्या न्य़ायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Nawab Malik: कुर्ली गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना न्यायालयाने पुन्हा दणका दिला आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांंच्या न्य़ायालयीन कोठडीत 14 दिवसाची वाढ करण्यात आली आहे. यावर पुढील सुणावणी 19 जानेवारीला होणार आहे. नवाब मलिक सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. (Nawab Malik)

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, नवाब मलिक हे सरकारमधील मंत्री होते. त्यावेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरून ईडीने (ED) त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. या प्रकरणात १९ जानेवारीपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर सध्या न्यायालयाच्या परवानगीने कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT