Jayant Patil news  saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : सेनेच्या ४० आमदारांच्या बंडामागे कोण होतं? जयंत पाटलांनी फडणवीसांवर केला गंभीर आरोप

राष्ट्रवादीच्या शिबिरात जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Jayant Patil News : 'शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात. यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराला आजपासून शिर्डीत सुरुवात झाली. या शिबीराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रास्ताविक केले. या प्रास्ताविकात जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

जयंत पाटील पुढे म्हणाले, 'आपल्या राष्ट्रवादी पक्षावर (NCP) जेव्हा टीका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे'.

'राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली', असेही जयंत पाटील म्हणाले.

'आज शेतकरी अडचणीत, अस्वस्थ शेतकरी आहे सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही, याबद्दल तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 'आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोचवा ती लोकांपर्यंत जायला हवीत, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बारामतीमध्ये जय पवार बाईक रॅलीमध्ये सहभागी

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT