NCP leader Hasan Mushrif In Trouble
NCP leader Hasan Mushrif In Trouble saam tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार! कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला

Chandrakant Jagtap

>>सचिन गाड

Hasan Mushrif Anticipatory Bail Rejected : कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मंगळवारी विशेष PMLA कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, ब्रिक्स कंपनीतील व्यवहारावरून मुश्रीफ यांच्या मागे ‘ईडी’च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि भागधारक शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी ED तपास करत आहे.

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर सुनावणी करताना पुढील दोन आठवडे मुश्रीफ यांना अटक न करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला दिले होते. तसेच हसन मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयात रितसर अटकपूर्व जामीन अर्ज करावा असे निर्देशही कोर्टाने त्यांना दिले होते. अटकपूर्व जामीनावर निकाल देईपर्यंत मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. (Maharashtra Political News)

त्यानंनतर मुश्रीफ यांनी जामीनासाठी केलेला अर्ज विशेष PMLA कोर्टाने फेटाळून लावला. त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान महिनाभरापूर्वी मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी ईडीच्या (Ed Action) पथकाने तिसऱ्यांदा छापा टाकला होता. त्यानंतर मुश्रीफ हे काही काळ नॉट रिचेबल होते.

दरम्यान ईडीने त्यांना मुंबई कार्यालयात हजर राहण्याचे समन्स देखील बजावले होते. त्यामुळे हसन मुश्रीफ यांना अटक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र त्यांना मुंबई हायकोर्टाने दोन आठवडे अटकेपासून दिलासा दिला होता. परंतु आता विशेष PMLA कोर्टाने फेटाळल्यानंतर मुश्रीफ यांना अटक होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! मुंबईचा विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

SCROLL FOR NEXT