Eknath Khadse
Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse News: अखेर शिक्कामोर्तब! एकनाथ खडसेंच्या खांद्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे पत्रही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना देण्यात आले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप नेते (BJP) गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT