“Dhananjay Munde’s demand for work sparks political reactions across Maharashtra.” saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde: कुणी काम देतं का काम? धनंजय मुंडेंच्या मागणीनं राजकीय पडसाद, जरांगेंचाही खोचक टोला

NCP Leader Dhananjay Munde : कुणी काम देतं का काम.अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडेंनी पक्षाकडे केलीय. मात्र धनंजय मुंडे काय म्हणाले? आणि मुंडेंच्या मागणीवर कसे राजकीय पडसाद उमटलेत? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

  • धनंजय मुंडेंनी पक्षाकडे "काम द्या" अशी मागणी केली.

  • मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे काही जबाबदारी नाहीये.

  • या मागणीवर विरोधक व इतर नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया दिल्या.

ऐकलंत. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांकडे काहीतरी काम देण्याची मागणी केलीय.आणि त्याला कारण ठरलंय.6 महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आलेला निवांतपणा. मंत्रिपद गेल्यानंतर विजनवासात गेलेले धनंजय मुंडे आरक्षणाच्या मुद्दयावरून पुन्हा राजकारणात अॅक्टिव्ह झाले असले तरी त्यांच्याकडे पक्षाची किंवा कुठल्याच कामाची ठोस जबाबदारी नाही. त्यातच आता मुंडेंनी काम देण्याची मागणी केल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मात्र धनंजय मुंडेंच्या या मागणीनंतर अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. मुंडेंना सार्वजनिक कामांशी संबंधित कोणतीही जबाबदारी देऊ नये, अशी मागणी केलीय. तर जरांगेंनी मुंडेंसाठी रोजगार हमीचा पर्याय सुचवलाय.दुसरीकडे गोपिनाथ मुंडेंचं स्वप्न साकार करण्यासाठी धनंजय मुंडेंनी ओबीसी आंदोलनात साथ देण्याचं आवाहन मंत्री छगन भुजबळांनी केलंय. तर अजित पवारांनी एका वाक्यात मुंडेंच्या मागणीवर उत्तर दिलंय.

धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड गँगने निष्पाप सरपंच संतोष देशमुखांची हैवानालाही लाजवेल अशी हत्या केली. त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद गेलं. पुढे मुंडे तब्बल 6 महिने विजनवासात गेले होते. मात्र आता राज्यात आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर धनंजय मुंडे अॅक्टिव्ह झाले. मात्र कुठलीही राजकीय जबाबदारी नसल्याने साईड लाईन झालेल्या मुंडेंची आता नटसम्राट चित्रपटातील कुणी घर देतं का घरं. अशाच प्रकारे कुणी काम देतं का काम? अशीच अवस्था झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

'The Bads Of Bollywood' मधील प्रसिद्ध अभिनेत्याला एकामागोमाग एक चित्रपटांची लॉटरी, जान्हवी कपूरसोबत झळकणार?

SCROLL FOR NEXT