Chhagan Bhujbal Saam Tv
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: लोकसभेनंतर राज्यसभेची उमेदवारी डावलली; मंत्री छगन भुजबळ नाराज? अजित पवार गट काय निर्णय घेणार?

Chhagan Bhujbal Upset Over Ajit Pawar Decision: अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना डावललं असल्याचं समोर आलंय. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Rohini Gudaghe

तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने छगन भुजबळ यांना लोकसभेपाठोपाठ राज्यसभेची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मंत्री छगन भुजबळ पुन्हा नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे भुजबळ यांच्या नाराजीचा सूर कमी आहे, परंतु नाराजी कायम असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते. त्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पदावर भुजबळांची नजर होती. भुजबळ ओबीसी असल्यानं पुन्हा एकदा उमेदवारी डावल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी नाकारली गेल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातून दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी भुजबळांच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, उमेदवारी घोषित होण्यासाठी लागणारा विलंब पाहून भुजबळ यांनी माघार घेतली होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर हेमंत गोडसे यांना महायुतीकडून उमेदवारी (Sunetra Pawar) दिली गेली. नाशिकमध्ये लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे, तर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले आहेत.

प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जून रोजी पोटनिवडणूक होत (Rajya Sabha Candidate Maharashtra) आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार अर्ज भरणार आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर या जागेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सध्या अजित पवार गटात सुरू आहे. दुपारी बारा वाजता त्या अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT