Jayant Patil News Saam TV
महाराष्ट्र

Jayant Patil News : शिंदे-फडणवीस सरकारला फक्त उद्योगपतींची काळजी; जयंत पाटलांची खोचक टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज पंढरपुरात आले होते.

भारत नागणे

Jayant Patil News : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे. त्यामुळेच अर्थकारणातील अंतर वाढू लागले आहे. उद्योगपती अधिक श्रीमंत होत आहेत तर सर्वसामान्य जनता गरीब होत चालली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते कल्याण काळे यांनी वाडीकुरीली येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळ्याव्याला हजेरी लावली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलंच टीकास्त्र सोडलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे सर्वेक्षण होतं आणि ते लोकसभेत मांडले जाते. मागील पाच वर्षाचा आढावा घेतला तर त्यात असं दिसतं आहे की भारतातील शेतकऱ्याचं उत्पन्न दीड ते दोन टक्यांनी घटल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठराविक लोक श्रीमंत होत आहेत. श्रीमंती आणि गरीबीमध्ये जमीन आसमानचा फरक पडू लागला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, की राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही तर त्यांना उद्योगपतींची जास्त काळजी आहे. त्यामुळेच अर्थकारणातील अंतर वाढू लागले आहे. उद्योगपती अधिक श्रीमंत होत आहेत तर सर्वसामान्य जनता गरीब होत चालली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आपल्या मागण्यासाठी महिलांनी सिंचन भवन येथील संबंधित अधिकाऱ्याच्या टेबलवर फोडल्या बांगड्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

Stye Eye Care : डोळ्याला रांजणवाडी येण्याआधी दिसतात 'ही' ६ लक्षणे, वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

SCROLL FOR NEXT