Sharad Pawar news
Sharad Pawar news  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : सुनेत्रा पवारांबाबत केलल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला : शरद पवार

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करायला जाताना शशिकांत शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना शशिकांत शिंदे यांच्यासोबत स्वत: शरद पवार देखील उपस्थित होते. शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. 'सनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला, असे शरद पवार म्हणाले.

बारामतीत अजित पवारांनी 'जिथे पवार आडनाव असेल, तिथे मतदान करायचे. म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना 'चूक काय, असे विचारत, 'दोन गोष्टी असतात... एक मूळ पवार आणि बाहेरच्या पवार' असा उल्लेख केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सूनेत्रा पवार या कमालीच्या भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

'सुनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. या देशात महिलांच्या आरक्षणाचा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो. महिलांसाठी अनेक निर्णय घेतले. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याचा निर्णय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे कारण नसताना अद्याप शब्दावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा केला आहे, असे शरद पवार म्हणाले.

साताऱ्यावर शरद पवार काय म्हणाले?

'साताऱ्याचं वैशिष्ट्य आहे की, सातारा नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणार आहे. स्वातंत्र्यांनातर अनेक नाव घेता येतील. कर्तृत्ववान लोकांची फळी होऊन गेली आहे, असे शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonia Gandhi: मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते, राहुल यांच्या निवडणूक प्रचारात सोनिया गांधी यांचं भावनिक भाषण

Beer Bar परवाना देण्यासाठी घेतली सव्वातीन लाखांची लाच, अधिका-यास अटक

Akola Crime News : अकोल्यात एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा; बहिणीनेच सख्या भावांची आणि भाच्यांची केली होती हत्या

Bhor Mahad ghat road : चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! भोर-महाड महामार्गावरील वरंध घाट बंद, कारण...

Delhi Liquor Policy Case : दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच होणार कारवाई? चार्जशीट दाखल करण्याचं काम सुरू

SCROLL FOR NEXT