Sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का ? पवार म्हणाले...

स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढतील का ? या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळेल ? या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : राज्यात आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने देखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज आयोगाने काही महापालिकेच्या ओबीसी आरक्षणाची सोडत जाहीर केली आहे. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढतील का ? या निवडणुकीत जनतेचा कौल कोणाला मिळेल ? या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. (Sharad Pawar News In Marathi )

शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या नाशिकच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी पत्रकार परिषद माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का,यावर भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी करायची की नाही हे नंतर बघू, अगोदर ओबीसी बाबत निर्णय होऊ द्या. आमच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी तरी सध्या आमची भूमिका आहे'. आपली राष्ट्रवादी काँग्रेस संघटना खिळखिळी झाली आहे का ? यावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'ज्या वेळेस निवडणुका लागतील,तेव्हा जनता कौल देईल'.

राज्याच्या मंत्रिमंडळावरूनही शरद पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. पवार म्हणाले, 'एक महिना झाला राज्याला मंत्री नाहीत. मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब योग्य नाही. राज्यात पूरस्थिती असताना काम करण्यासाठी मंत्रिमंडळ असणं आवश्यक आहे. विरोधी पक्षनेते हे ज्या भागात लोक संकटात आहे, त्या ठिकाणी भेट देत आहेत. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोध घ्यावा. स्वागताचे कार्यक्रम घ्यायचे की शेतकरी भेटी घ्यायच्या हा विरोधाभास तुम्हीच बघत आहात'.

शिंदे सरकार पडेल का ? पत्रकाराच्या या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'सराकर पडेल निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिष नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही आम्ही तयार आहोत'. तर कोर्टाच्या ओबीसी आरक्षणावरील निर्णयावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'न्यायालयाने ओबीसी आरक्षणावर दिलेला निर्णय चिंताजनक आहे. मोठा वर्ग नाराज होईल, हा वर्ग सत्तेबाहेर जातो की काय अशी भीती याने निर्माण झाली आहे'. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या प्रकल्प रद्द करण्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, 'जे प्रकल्प आमच्या सरकारने मंजूर केले, टेंडर निघाले. त्याला विलंब करणे किंवा रद्द करणे योग्य नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

SCROLL FOR NEXT