Sharad Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा मास्टर प्लान, शरद पवारांनी दिल्या 'या' सूचना

आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मास्टर प्लान केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक

मुंबई : आगामी होणाऱ्या १४ महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महापालिकांवर सत्ता (Municipal corporation election) स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मास्टर प्लान केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांसह मंत्र्यांनाही कानमंत्र दिला आहे.

चौदा महापालिकांमध्ये जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु करा. शिवसेना (Shivsena) आणि कॉंगेस (congress) नेत्यांबरोबर चर्चा करा. आघाडी करण्यात नेमकी काय समस्या आहे, ते समजून घ्या, अशा सूचना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आणि मंत्र्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, आगामी होणाऱ्या महापालिका निवडुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंत्र्यांनाही जबाबदारी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागाची जबाबदारी देण्यात आलीय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, वसई-विरार, उल्हासनगरची जबाबदारी दिलीय.

प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील यांना नागपूर व अमरावती, कोल्हापूरची जबाबदारी हसन मुश्रीफ तर नाशिकसाठी छगन भुजबळ तर दत्ता भरणे यांना सोलापूरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये होणारी रणधुमाळी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

Maharashtra Police : ४ लाख रुपयांनी भरलेली बॅग हरवली, अवघ्या अर्ध्या तासांत शोधून काढली, पाली पोलिसांचे होतेय कौतुक

Solapur : सोलापूरमध्ये सीना नदीचा पूर ओसरला, पण पावसाला पुन्हा सुरुवात |VIDEO

Anya Singh: 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'मधली आन्या सिंह कोण आहे? शाहरुख खानसोबत आहे खास नातं

SCROLL FOR NEXT