Sharad Pawar News in Marathi  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar |अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवल्या पाहिजे : शरद पवार

अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवल्या पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Sharad Pawar News : 'भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवल्या पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. (Sharad Pawar News In Marathi)

आज शनिवारी कोल्हापुरात भटक्या विमुक्त जमाती संघटनाचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला शरद पवारांनी हजरे लावली. शरद पवार यांना आज 'लोकशाही समाजवादाची राखण करणारा जानता राजा' किताब प्रदान केला. तसेच फुले पगडी आणि मानपत्र देऊन सन्मानित केले. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी केला पवारांना हा किताब प्रदान केला.

शरद पवार भटक्या विमुक्त जमाती संघटनाचे अधिवेशनात उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले, भटके विमुक्त जमाती संघटनांनी ५० वर्ष कष्ट केले. त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की, हा समाज गुन्हेगार आहे, असा उल्लेख केला जायचा. १९५२ साली त्यावेळचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठपका पुसला'.

'भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली असं आजही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल. शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्यांचे मार्ग वेगळे होते, काही लोकांना ते आवडले नसेल', असेही ते म्हणाले. 'भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल, असा संदेश पवारांनी उपस्थितांना दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुढच्या वर्षी लागणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून राडा, भाजप आमदारांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून फेकल्या, VIDEO

NCP Symbol Hearing : पुढील ३६ तासांत... पक्ष आणि घड्याळ चिन्हावरून सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

Relationship Tips: ब्रेकअप का होतो? ही आहेत प्रमुख कारणे

SCROLL FOR NEXT