शिवसेनेचं चिन्ह गोठवले तर काय? निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्वाची माहिती समोर

केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. जवळपास चार तास चाललेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.
shivsena news
shivsena news saam tv
Published On

शिवाजी काळे

Shivsena News : शिवसेना कुणाची? शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार? की शिवसेनेचं चिन्ह गोठावणार? या प्रश्नाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने (Shivsena) धनुष्यबाणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महत्वाची कागदपत्र सादर केली आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक पार पडली. जवळपास चार तास चाललेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर महत्वाची माहिती समोर आली आहे.

shivsena news
राहुल गांधींच्या सावरकरांवरील वक्तव्यावरून नवा वाद; देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'उद्धव ठाकरे यांना...'

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेपुढे मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवेसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाने शिवसेना आणि धनुष्यबाणावर दावा केला आहे. त्यामुळे झालेल्या वादामुळे दोघांना कोर्टाची पायरी चढावी लागली. तर धनुष्यबाणाबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाची बैठक पार पडली.

बैठकीला निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक उपायुक्त, निवडणूक चिन्ह प्रभारी, निवडणूक आयोग न्याय विभागाचे अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य प्रमुख बैठकीला उपस्थित होते. जवळपास चार तास बैठक चालली आहे. बैठकीनंतर काय निर्णय घेण्यात येईल याकडे महराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

shivsena news
घराबाहेर पडलेल्यांना घरावर हक्क कसा काय सांगता येईल? शिवसेना खासदाराचा शिंदे गटाला प्रश्न

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठावल्यास दोन्ही गटाला उपलब्ध १९७ पैकी एका चिन्हाची निवड करावी लागणार आहे. यामध्ये ठाकरे गटाला हवं असलेलं ढाल, तलवार किंवा वाघ अशा प्रकराचे कोणतंही चिन्ह सदर यादीत नाही. त्यामुळे दोन्ही गट कोणत्या चिन्हाची निवड करतात हे पाहणं महत्वाचं आहे.

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे सादर केली कागदपत्रे

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण कागदपत्र सादर केली आहेत. कागदपत्रांचा महत्वाचा तपशील साम टीव्हीच्या हाती लागला आहे. विधानसभेतील १४ आमदार विधान परिषदेतील १२ आमदार लोकसभेतील सात खासदार राज्यसभेतील तीन खासदार शिवसेनेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील १६० सदस्य, १८ राज्य प्रभारी असल्याचा दावा कागदपत्रात केला आहे. तसेच १९२ जिल्हाप्रमुख, ६०० उपजिल्हाप्रमुख , ७०० तालुकाप्रमुख असल्याचा दावा त्यांनी कागदपत्रात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com