NCP  saam tv
महाराष्ट्र

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, लवकरच भाजप प्रवेश

Nashik News : सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच भाजपसोबत जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. अंजली दमानिया आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या वक्तव्यांमुळे पडद्यामागे नक्की काय घडतंय, याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे.

एकीकडे या चर्चा सुरु असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाशिकमधील अत्यंत जवळचे मानले जाणारे सुनील मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. (Political News)

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मालेगावच्या दौऱ्यावर असतानाच सुनील मोरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुनील मोरे हे राष्ट्रवादीसह शहर विकास आघाडीच्या माजी ११ नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह भाजप पक्षप्रवेश करणार आहेत. (Latest News Update)

सुनील मोरे छगन भुजबळांचे नाशिकमधील खंदे समर्थक मानले जातात. नाशिक ग्रामीण भागात सुनील मोरे यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे सुनील मोरे भाजपमध्ये गेल्याचा मोठा फटका छगन भुजबळांना आगामी निवडणुकीत बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Curry Recipe : सणासुदीला खास बनवा पनीर करी, चव हॉटेलपेक्षा भारी

Maharashtra Dasara Melava Live Update: उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी रवाना

पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक बकरी आणि बोकड भेट, महाराष्ट्र राज्य खाटिक समाजाचा निर्णय|VIDEO

मुंबईचा बिलेनियर भिकारी! दादरच्या शिवाजी पार्कजवळ घर, ठाण्यात २ दुकाने, २ फ्लॅट; वाचा डोळे विस्फारून टाकणारी स्टोरी

OBC कट ऑफ 485, EWS 450, मग आरक्षणाचा फायदा कोणाला? धनंजय मुंडेंनी आकड्याचं गणित मांडलं

SCROLL FOR NEXT