Sunil Tatkare faces a complaint challenging his position as NCP Maharashtra state president. saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर; सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार? थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

Sunil Tatkare State President: राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद घटनाबाह्य असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • सुनील तटकरेंच्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह

  • तटकरेंचे पद घटनाबाह्य असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार

  • या तक्रारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला

राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. यातील सर्वात मोठी हालचाली राष्ट्रवादी पक्षात घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षतील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्ष अध्यक्ष निवडीपासून ते पक्षातील कार्यकारणीपर्यंत सर्वकाही आलबेल नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होतोय. सुनील तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.

अजित पवार पक्षातील काही नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला पक्षातूनच विरोध होतोय. तटकरे यांचे पद घटनाबाह्य अशी तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आलीय.

जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार केलीय. पक्षाच्या संविधानाला डावलून, अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती करण्यात आलीय. सुनील तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.

गोरे यांनी आपल्या तक्रारीत तटकरेंच्या कार्यकाळावरून सवाल केलाय. सुनील तटकरेंच्या नियुक्तीचा 3 वर्षांचा सामान्य कार्यकाळ जुलै 2026 मध्येच संपुष्टात आला आहे. कोणतीही संघटनात्मक निवडणूक न घेता तटकरे अद्याप पदावर कसे कार्यरत आहेत? असा सवाल त्यांनी केलाय. तटकरेंच्या जालना दौऱ्यात अजित पवारांच्या नावाच्या घोषणा दिल्याने तटकरेंनी जिल्ह्यातील अनेक पदाधिकार्यांना पदावरून हटवल्याचाही आरोपही भाऊसाहेब गोरे यांनी केलाय. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावे अशी मागणी केलीय. अजित पवार सुद्धा प्रदेश अध्यक्ष बदलणार होते, असा दावाही रुपाली ठोंबरे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik-Pune High-Speed ​​Railway Project: महामार्गावर रास्ता रोको' आंदोलन करणं भोवलं; आमदार सत्यजित तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल

पहिली ते बारावी एकच शाळा; नीती आयोगाच्या पर्यायानं शालेय शिक्षणात होणार मोठा बदल

विकसित भारताची निर्मिती कशी होणार? भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला मोलाचा सल्ला

मिरवणुकीत मोठा गोंधळ; PSI आणि पोलिस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण|VIDEO

BPच्या औषधांमुळे कॅन्सरचा धोका? जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

SCROLL FOR NEXT