tuljapur, navratri , tulja bhavani mandir , tulja bhavani temple , mp amol kolhe saam tv
महाराष्ट्र

TuljaBhavani : खासदार अमाेल काेल्हेंचे तुळजाभवानीस साकडं, म्हणाले...,

पुढील नऊ दिवस तुळजाभवानीचा हा जागर तुळजापूरात उत्साहात जागवला जाणार आहे.

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Tuljapur Navratri News : तुळजापूरात (tuljapur) तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळंं तुळजापूर नगरी भक्तांनी गजबजली आहे. सर्वत्र नवरात्राेत्सव निमित्त माेठा उत्साह आहे. दरम्यान भाविकांबराेबरच आज खासदार अमाेल काेल्हे यांनी तुळजाभवनीचे दर्शन घेतलं.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला आज पासून तुळजापूरात सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षा नंतर यंदा नवरात्र महोत्सवाचा उत्साहा तुळजापूरमध्ये शिगेला पोहोचला आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी (tulja bhavani temple) तुळजापूरमध्ये दाखल झाले आहेत. नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर नगरी गजबजली आहे. पुढील नऊ दिवस तुळजाभवानीचा हा जागर तुळजापूरमध्ये उत्साहात जागवला जाणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार तथा सिने अभिनेते अमोल कोल्हे (mp amol kolhe) यांनी आज नवरात्रच्या पहिल्या माळे दिवशी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. गेल्या दोन वर्षात कोरोना काळामुळे देवीचे दर्शन घेता आले नाही. यावर्षी मात्र आईच्या दर्शनासाठी मी तुळजापुरात आलो आहे.

राज्यात सध्या अतिवृष्टी, लंपी यासारखी अनेक संकट आहेत. ती संकट दूर व्हावी यासाठी आई तुळजाभवानी चरणी साकडे घातलं असल्याचे खासदार कोल्हे यांनी नमूद केले. दरम्यान यावेळी खासदार काेल्हे यांनी राजकीय भाष्य करण्याचे टाळलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iPhone Discount Price: आयफोन झाला स्वस्त प्रत्येकाचा वाढणार स्वॅग; जाणून घ्या आयफोन १५, १६ प्लसचे नवे दर

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

SCROLL FOR NEXT