Navneet Rana | नवनीत राणा  SaamTvNews
महाराष्ट्र

नवनीत राणा यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून Y Plus सुरक्षा!

नवनीत राणा अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात तसेच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता.

अरुण जोशी

अमरावती : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीसह नेत्यांवर टीकेची झोड उठवणाऱ्या, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याआधी महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील विविध नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनाही केंद्रीय गृहमंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

हे देखील पहा :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षा (Y plus security) प्रदान करण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यांनतर राणा यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ (SPO), एनएसजी (NSG) चे कमांडो ,सीएसएफ (CSF) चे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार असून आता 24 तास हे सुरक्षा पथक खासदार राणा यांच्या समवेत राहणार आहे. देशभरात कुठेही फिरताना राणा यांना हे वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच असणार आहे.

नवनीत राणा ह्या सातत्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे लोकसभेत काढत असतात. देशातील अनेक गंभीर प्रश्नांना वाचा फोडतात सोबतच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात त्यामुळे त्यांचा जीवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. याचीच गांभीर्याने दखल घेऊन अमित शाह यांनी नवनीत राणा यांना हि सुरक्षा प्रदान कारण्याबाबतचे निर्देश दिले होते. ११ कमांडोंचे सुरक्षा कवच आता नवनीत राणा यांच्याभोवती राहणार आहे. विशेष म्हणजे यांनतर नवनीत राणा यांचा आता देशातील अति महत्वाच्या म्हणजेच VVIP व्यक्तींमध्ये समावेश झाला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

Knee Pain: मांडी घालून बसल्यावर उठताना नेहमी गुडघे दुखतात? दुर्लक्ष करू नका, असू शकते ‘या’ आजारांचे लक्षण

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

SCROLL FOR NEXT