speaker saam tv
महाराष्ट्र

Hanuman Jayanti: 'हनुमान चालीसा पठणासाठी सर्व मंदिरात मोफत भोंगे वाटणार'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हनुमान जयंती दिनी मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केले पाहिजे अशी अपेक्षा आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली.

अरुण जोशी

अमरावती : हनुमान जयंतीच्या (hanuman jayanti) पार्श्वभुमीवर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाचे (hanuman chalisa) सामुदायिक पठणाचा कार्यक्रम उद्या अमरावती (amravati) येथे आयाेजित केला आहे. दरम्यान सर्व मंदिरात हनुमान चालीसाचे पठण व्हावे यासाठी मोफत भोंग्याचे (bhonga) वाटप करणार असल्याची माहिती आमदार रवी राणा (ravi rana) आणि खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी दिली. (amravati latest marathi news)

दोन दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी एका मंदिरात हनुमान चालीसाचे पठण केले हाेते. उद्या हनुमान जयंती निमित्त राणा दाम्पत्याने सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयाेजित केला आहे. हा उपक्रम गेली अनेक वर्ष करीत असल्याचे आमदार राणा यांनी नमूद करीत भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

दरम्यान सध्या भोंगा व हनुमान चालीसा पठणावर मोठा वाद सुरु आहे. त्यातच खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीस पठण आणि भाेंग्याचे सार्वजनिक वाटप असा उपक्रम घेतल्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या आवाहनानंतर हनुमान चालीसा चर्चेत आल्याने राज्यातील राजकीय वातावरण देखील तापले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT