बच्चे कंपनीसोबत राणा दांपत्याने लुटला पतंगबाजीचा आनंद ! SaamTvNews
महाराष्ट्र

बच्चे कंपनीसोबत राणा दांपत्याने लुटला पतंगबाजीचा आनंद !

युवा स्वाभिमान पार्टीतर्फे पतंग महोत्सवाचे आयोजन

अरुण जोशी

अमरावती : बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टी तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही मकर संक्रांतीच्या निमित्याने पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. स्थानिक न्यू हायस्कुल बेलपुरा शाळेच्या खुल्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या पतंग महोत्सवात लहान मुलांना पतंग व तिळगुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. मकरसंक्रांतीच्या निमित्याने यंदाही युवा स्वाभिमान पार्टी तर्फे आयोजित पतंग महोत्सवात शेकडो लहान मुलं-मुली सहभागी झाले.

हे देखील पहा :

यावेळी राणा दांपत्याने देखील पतंगबाजीचा आनंद लुटला. प्रा.अजय मोरया,माजी नगरसेविका जयश्री मोरया यांनी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकडो लहान मुला मुलींना पतंग, धागा व चक्कर वाटप करण्यात आले.सोबतच प्रत्येकाला तिळगूळ लाडूचे वाटप करण्यात आले. उंच उडणाऱ्या पतंगाप्रमाणे प्रत्येकाचा विकास व्हावा व सर्वांच्या आयुष्यात तिळगुळाचा गोडवा निर्माण होऊन सर्वांचे कल्याण व्हावे अश्या शुभेच्छा यावेळी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणी यांनी नागरिकांना दिल्या.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी आपले चिरंजीव रणवीर व इतर लहान बालकांसोबत १५ फूट मोठी पतंग उडवून पतंगबाजी व पेचलडाईचा आंनद घेतला. यावेळी समाजसेवक लप्पी सेठ जाजोदिया, प्रा.अजय मोरया,जयश्री मोरया, जयंतराव वानखडे, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, शैलेंद्र कस्तुरे, जिल्हा संघटक अभिजित देशमुख, निलेश भेंडे, पराग चिमोटे, अजय बोबडे, सुधीर लवणकर, मंगेश कोकाटे, सचिन सोनोने आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांचं पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन

Rain Havoc : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा! भिंत कोसळून मुलीचा मृत्यू; होर्डिंग पडून तरुणाचा जागीच अंत

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! मुठा नदीवरील पूल कायमचा बंद, पानशेत पुलाबाबतही मोठा निर्णय; पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today : खुशखबर! सोन्याचे दर वाढले की घसरले? लगेचच जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

HBD Tejashri Pradhan : 'वीण दोघांतली ही तुटेना'साठी स्वानंदी किती पैसा घेते? तेजश्री प्रधानच्या संपत्तीचा आकडा वाचून घाम फुटेल

SCROLL FOR NEXT