Fraud  Saam tv
महाराष्ट्र

Fraud : नेव्हीमध्ये नोकरीचे आमिष देत दुबईला पाठविले; २० तरुणांची आर्थिक फसवणूक

Navi Mumbai News : नेरूळ एमआयडीसीमधील एक्स.पी.ओ. शिपिंग मॅनेजमेंट कंपनीतर्फे नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष देत प्रत्येकी ३ लाख रुपये घेऊन वीस पेक्षा अधिक तरुणांना दुबईला पाठविले

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत असताना देखील याला अनेकजण बळी पडत आहेत. असाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला असून नेरूळमधील एका तरुणाला नेव्हीमध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडत तरुणाने संबंधिताला रोख रक्कम दिली. यात साधारण ३ लाख रुपयात फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. बऱ्याचदा जास्तीचा नफा देण्याचे आमिष देत फसवणूक करण्यात येत असते. तसेच नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक करण्यात येत असल्याच्या घटना देखील घडत असतात. तरी देखील अमिषाला बळी पडून हातातील रक्कम देत असतात. असाच प्रकार नेरूळमध्ये घडला असून यात तरुणाची फसवणूक झाली आहे. 

२० तरुणांना पाठविले दुबई 

नेरूळ एमआयडीसीमधील एक्स.पी.ओ. शिपिंग मॅनेजमेंट कंपनीतर्फे नेव्हीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष देत प्रत्येकी ३ लाख रुपये घेऊन वीस पेक्षा अधिक तरुणांना दुबईला पाठविले. यात त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय. नोकरीच्या आशेने दुबईला गेलेल्या तरुणांना प्रत्यक्षात तिथे सदर कंपनी अस्तित्वातच नसल्याची माहिती मिळाली असता तरुणांनी तात्काळ भारतात परतीचे तिकीट काढले. 

पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ 

दरम्यान सदर तरुणांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे केली असता पोलिसांनी प्रथम गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. तसेच आमचीच पिळवणूक केली असल्याचा गंभीर आरोप तरुणांनी केला आहे. त्यामुळे तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांना पोलिसांचा वरदहस्त आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Growth: हेल्दी, जाड अन् सिल्की केसांसाठी जास्वंदाचे तेल ठरेल सगळ्यात बेस्ट

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

SCROLL FOR NEXT