Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : घरफोडीतील सराईत गुन्हेगार ताब्यात; ५ गुन्ह्यांची उकल करत २० लाखांचा माल हस्तगत

Navi Mumbai : मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केलं. यानंतर त्याची चौकशी करण्यात आली

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: मागील काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. या घरफोडीचा तपास सुरु असताना एका संशयित सराईत गुन्हेगाराला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. (Police) पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडून २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Breaking Marathi News)

नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील बोनकोडे विभागात झालेल्या घरफोडीचा पोलिसांकडून तपास सुरु होता. याचा तपास सुरु असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत आणि सीसीटीव्हीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार कोपरखैरणे (Crime News) पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला जेरबंद केलं. यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१७ तोळे सोने हस्तगत 

पोलिसांनी सदर आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून ५ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. तर या कारवाई दरम्यान तब्बल २० लाख रुपये किंमतीचे १७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखैरणे पोलीसांना यश आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT