Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : पुण्यातील तरुणाला लाखो रुपयांचा गंडा; नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे नाव वापरून फसवणूक

Navi Mumbai News : सायबर गुन्हेगारांकडून समोरच्या व्यक्तीला फोन करून भीती दाखविली जाते. यातून पैसे उकडण्याचे काम केले जात असते.

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे  
नवी मुंबई
: सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे वेगवेगळे तंत्र वापरत असल्याचे समोर आले आहे. आता तर थेट नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव वापरून पुण्यातील तरुणाची लाखो रुपयांत फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सायबर गुन्हेगारांकडून समोरच्या व्यक्तीला फोन करून भीती दाखविली जाते. यातून पैसे उकडण्याचे काम केले जात असते. दरम्यान पुण्यातील एका तरुणाला फोन करून (Navi Mumbai) नवी मुंबई पोलीस आयुक्तांचे नाव सांगत मनी लॉन्ड्रिंग बाबत चौकशी करण्याच्या बहाण्याने तब्बल १० लाख रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे नाव आणि खोटे कागदपत्र दाखवत ही फसवणूक (Cyber Crime) करण्यात आली आहे. याप्रकरणी तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर ३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

मुंबईतील फेडेक्स कुरिअर कंपनीमधून मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी मिलिंद भारंबे बोलतोय असे सांगून इराणला कुठले पार्सल पाठवले आहे; अशी विचारणा केली. यातून बचाव करण्याच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अश्या प्रकरणी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन नागरिकांना केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT