Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : विदेशी स्कॉचच्या बाटलीत बनावट मद्य टाकून विक्री; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Navi Mumbai News : पोर्टर अँपच्या वाहनाची पथकाने झडती घेतली असता त्यामध्ये उच्चप्रतीच्या स्कॉच व्हिस्कीच्या १९ बॉटल मिळून आल्या. तर हे मद्य कोपरखैरणे येथील एका घरातून आणले असल्याची माहिती पथकाला मिळाली

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 

नवी मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई केली आहे. यात विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या असलेल्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून विक्री करण्यात येत होती. अशा पद्धतीने बनावट मद्य विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सदरची कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्या जमा करून या मध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याची कमी किंमतीत पोर्टर अँपच्या माध्यमातून तस्करी करण्यात येत होती. याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अशा पद्धतीने तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. 

बनावट मद्य सापडले 

दरम्यान पोर्टर अँपच्या वाहनाची पथकाने झडती घेतली असता त्यामध्ये उच्चप्रतीच्या स्कॉच व्हिस्कीच्या १९ बॉटल मिळून आल्या. तर हे मद्य कोपरखैरणे येथील एका घरातून आणले असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानंतर पथकाने सदरच्या घरावर देखील उत्पादन शुल्क विभागातर्फे छापा टाकण्यात आला. या ठिकाणी विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकून त्याला सील करण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आहे. 

दोन जणांवर गुन्हा दाखल 

उच्च प्रतीच्या विदेशी स्कॉच व्हिस्कीच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, बूच आणि लेबल असे साहित्य जप्त करण्यात आले असून या कारवाईत तब्बल ७ लाख ५२ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT