Dhananjay Munde diagnosed with Bells Palsy  SaamTV
महाराष्ट्र

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंना 'बेल्स पाल्सी' नावाचा आजार, आजाराबाबत खुद्द धनुभाऊंनी सांगितलं...

Dhananjay Munde Suffers Bells Palsy : माझ्या दोन्ही डोळ्यांवर १५ दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या.

Prashant Patil

बीड : राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. धनंजय मुंडेंना 'बेल्स पाल्सी' नावाचा आजार झाला आहे. या आजाराच्या रुग्णांना दोन मिनिटंही बोलता येत नाही, अशी माहिती धनंजय मुंडेंनी दिली आहे.

धनंजय मुंडेंचं ट्वीट (एक्स)

माझ्या दोन्ही डोळ्यांवर १५ दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ.टी.पी.लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण १० दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

त्याच दरम्यान मला Bell's palsy (बेल्स पाल्सी) नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉ.अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.

याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल, असं ट्वीट(एक्स)वर धनंजय मुंडेंनी पोस्ट केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT