NCP 
महाराष्ट्र

...तर पडळकरांच्या बगलबच्च्यांना घरात घुसून मारू; युवती सेल

Siddharth Latkar

सातारा : राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर sakshna salgar यांना पडळकरांच्या gopichand padalkar बगलबच्चांनी फोन करून अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा आम्ही निषेध करतो. अशा धमक्यांना राष्ट्रवादीच्या महिला, युवती घाबरणार नाहीत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाघिणी आहोत. अशा बगलबच्चांना घरात घुसून मारू, असा इशारा राष्ट्रवादी युवती सेलच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी येथे दिला. (nationalist-congress-yuvati-cell-warns-gopichand-padalkar-satara-political-news)

युवती सेलच्या प्रदेशाध्यक्षा सलगर यांना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने फोनवरून धमकी देत अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. या भ्याड कृत्याचा सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या युवती सेलने nationalist congress party yuvati cell आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत स्मिता देशमुख म्हणाल्या, ‘‘महिला सर्वच क्षेत्रात आणि राजकारणातही आघाडीवर आहेत. प्रत्येकाला स्वत:चे मत मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार पडळकरांचे बगलबच्चे आमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाहीत. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार sharad pawar, खासदार सुप्रिया सुळे supriya sule, उपमुख्यमंत्री अजित पवार ajit pawar यांनी आम्हाला लढण्याची ताकद दिली आहे. महाविकास आघाडीत mahavikas aghadi महिला सुरक्षित आहेत.

’’ गोपीचंद पडळकर पवार साहेबांविषयी केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात. त्यांच्या बगलबच्चांना मला सांगण्याचे आहे, की हे प्रकार थांबवा. महाराष्ट्रातील सर्व महिला, युवती पेटून उठल्या आहेत. महिलांबाबत अशी अत्याचाराची भाषा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT