जुलैत 15 दिवस बॅंकेस सुटी; RBI ने जाहीर केली यादी

Bank
Bank

सातारा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (rbi) जुलै 2021 महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची (bank holiday) यादी नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनूसार सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच खाजगी क्षेत्रातील परदेशी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक बँका जाहीर केलेल्या 15 दिवासांच्या सुट्टीच्या दिवशी बंद राहतील. (rbi-decleared-bank-holidays-july-2021-in-india)

दरम्यान जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीमध्ये नऊ सुट्ट्यांचा समावेश आहे. ज्या वेगवेगळ्या धार्मिक, उत्सव किंवा राज्यनिहाय येतात. इतर सहा दिवस आठवड्याच्या आहेत. काही राज्यात या सुट्ट्यांना अपवाद राहील असे ही आरबीआयने त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) संकेतस्थळावर जाहीर केलेली यादी

4 जुलै 2021 - रविवार

10 जुलै 2021 - दुसरा शनिवार

11 जुलै 2021 - रविवार

12 जुलै 2021 - सोमवार - कांग (राजस्थान), रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)

13 जुलै 2021 - मंगळवार - भानु जयंती (गंगटोक)

Bank
वीजबिले भरुन ग्रामपंचायतींना आर्थिक बळकट करा : उदयनराजे

14 जुलै 2021 - बुधवार - द्रुकपा टेशेची (गंगटोक)

16 जुलै 2021- गुरुवार - हरेला पूजा (देहरादून)

17 जुलै 2021 - शनिवार - यू तिरतो सिंग दिवस / खार्ची पूजा (अगरताळा, शिलांग)

18 जुलै 2021 - रविवार

19 जुलै 2021 - सोमवार - गुरु रिंपोचे थुंगकर टेश्शेचू

Bank
सातारा जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू

20 जुलै 2021 - मंगळवार - बकरी ईद (जम्मू, कोची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)

21 जुलै 2021 - मंगळवार - ईद अल अधा (आईजाल, भुवनेश्वर, गंगटोक, कोची आणि तिरुवनंतपुरम वगळता देशभर)

24 जुलै 2021 - चौथा शनिवार

25 जुलै 2021 - रविवार

31 जुलै 2021- शनिवार - केर पूजा (अगरतला)

Bank
शेखर गोरे यांच्याकडून दहिवडी कोविड सेंटरला 'मदतीचा हात'

दरम्यान एकूण 15 पैकी 9 सुट्टया या राज्यांशी -संबंधित असल्याने सर्व बँका एकूण 15 दिवस बंद राहणार नाहीत. केवळ २१ जुलै रोजी ईद अल अधा ही या यादीतील एकमेव सर्वत्र सुटी आहे. परंतु तरीही ही सुटी देखील संपूर्ण देशभर नसेल. ते राज्यनिहाय वाटपावर अवलंबून राहील. भुवनेश्वर , गंगटोक, कोची आणि तिरुवनंतपुरम येथे ही सुटी दूस-या दिवशी दिली जाऊ शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केल्यानूसार आठवड्याच्या बहुतांश दिवसात बॅंकेचे व्यवहार रू राहतील, ही बाब निश्चित दिलासा देणारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com