Earthquake  Saam Tv
महाराष्ट्र

Earthquake : अचानक जमीन हादरली, महाराष्ट्रात इथं बसले सकाळी भूकंपाचे तीव्र हादरे; लोकांची पळापळ अन्...

Nashik earthquake : नाशिकच्या पेठ तालुक्यात सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. गोंदे, करंजाळी, भायगावसह ६ गावांमध्ये हादरे जाणवले. जाणून घ्या संपूर्ण अपडेट.

Namdeo Kumbhar

अभिजित सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Nashik Peth earthquake today : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाने नाशिक जिल्हा हादरला आहे. येथील पेठ तालुक्यात भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक जमीन हादरल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. पण सलग बसणाऱ्या धक्क्यांमुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज नक्की काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजता नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य हादरे नोंदवले गेले. ६ गावांची जमीन हादरल्याची माहिती आहे. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे या ग्रामीण परिसरात भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले.

प्रशासकीय यंत्रणा अलर्टवर

घरात भांडी आणि वस्तू हलल्याचे जाणवताच अनेक नागरिक घराबाहेर सुरक्षित ठिकाणी धावले. काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्हा भूकंपाने सारखा हादरत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे होतोय? याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सतत बसणाऱ्या या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. भूगर्भशास्त्र तज्ज्ञांमार्फत या भूकंपाच्या कारणांचा आणि केंद्रांचा अभ्यास केला जात आहे.

मागील महिनाभरातील भूकंपाची मालिका

पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी व डोंगरी भागात गेल्या ३ ते ४ आठवड्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. जुलैच्या अखेरपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत या भागात १० पेक्षा जास्त लहान-मोठे धक्के बसल्याची नोंद झाली आहे.

या धक्क्यांची तीव्रता ३.२ ते ४.३ रिश्टर स्केलदरम्यान राहिली आहे. काही दिवसांपूर्वी दिंडोरीतील भनवड परिसरात सर्वाधिक ४.३ रिश्टर स्केलचा धक्का बसला होता. पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमधील गावांना यापूर्वीही वारंवार भूकंपाचे हादरे बसले असून, काही भागांतील घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरकारला जागं करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ठाकरेसेनेचे आंदोलन

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या नृत्यावरून नवा वाद! भाजप नगरसेविकेची थेट पोलिसांत तक्रार

Mustard Oil vs Sunflower Oil: मोहरीचे तेल की सूर्यफूल तेल? स्वयंपाकासाठी कोणते तेल अधिक फायदेशीर, जाणून घ्या दोघांमधील फरक आणि फायदे

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18-22 आणि 24 कॅरेटचे दर

राहुल गांधींना हायकोर्टाचा जोरदार झटका; मोदींबद्दल टिप्पणी केल्याप्रकरणी मानहानीची तक्रार रद्द करण्यास नकार

SCROLL FOR NEXT