Yewla Crime Saam tv
महाराष्ट्र

Yewla Crime : कोळम वस्तीवर सशस्त्र दरोडा; घरातील महिला- पुरुषांना जबर मारहाण करत दरोडेखोरांनी ऐवज लांबविला

Nashik News : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गाव वस्तीवर अनेक कुटुंब घराबाहेर झोपत असतात. त्यानुसारच कोळम वस्तीवर असलेल्या आवारे कुटुंबातील पुरुष रात्री घराबाहेर ओट्यावर झोपले होते

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या वाळूज परिसरात शेतकऱ्यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली होती. यानंतर आता नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवारे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. यात घरात असलेल्या महिला व पुरुषांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करत दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. 

नाशिकच्या येवला तालुक्यातील कोळम परिसरातील वस्तीवर आज रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक घटना घडली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गाव वस्तीवर अनेक कुटुंब घराबाहेर झोपत असतात. त्यानुसारच कोळम वस्तीवर असलेल्या आवारे कुटुंबातील पुरुष रात्री घराबाहेर ओट्यावर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अख्खी वस्ती गाढ झोपेत असताना चार ते पाच जणांनी येथे येत दरोडा टाकला. 

चिमुकलीच्या गळ्यावर चाकू लावत जबरी लूट 

घराबाहेर झोपलेल्या पुरुषांना जाग आल्यानंतरते उठले असता या दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवून दरवाजा उघडण्यास भाग पाडले. यानंतर या दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील ५० हजार रुपये रोकड चोरून नेली.   

परिसरात भीतीचे वातावरण 

दरम्यान दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत घरातील दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या दोघी महिलांवर शासकीय रुग्णालयात उपचार कारण्यात आले आहे. तर घटनेची माहिती येवला पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करत तपासाला सुरवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी तात्काळ दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT