Jalna Water Scarcity : दुष्काळाच्या झळा; गोदावरी नदीत पाणी आटल्याने मृत माशाचा खच, २५ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत

jalna News : जालन्यातील पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीवरील निम्न उच्च पाणीपातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने नदीपात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. मृत मासे नदीकाठावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत
Jalna Water Scarcity
Jalna Water ScarcitySaam tv
Published On

अक्षय शिंदे 

जालना : उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे धरण, तलाव यासोबतच नदीतील पाणी देखील आटू लागले आहे. दरम्यान जालन्यातून वाहत असलेल्या गोदावरी नदीतील पाणी आटले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून आता यामुळे भीषण चित्र पाहण्यास मिळाले आहे. नदीतील पाणी आटल्याने नदीतील माशांचा मृत्यू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.  

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या उन्हामुळे पाणी पातळीत प्रचंड घट होत आहे. नदी, धरणे देखील कोरडे पडत आहे. तर जालन्यातील पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीवरील निम्न उच्च पाणीपातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने नदीपात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. मृत मासे नदीकाठावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. गोदावरी निम्न उच्च पाणीपातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने मासे पाण्याअभावी तडफडून मृत पावत आहे. 

Jalna Water Scarcity
Maharashtra Weather Update: विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढणार, कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट? वाचा आजचे हवामान

वीस वर्षात प्रथमच बंधारा पडला कोरडा  

जालन्यात पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर नदीपात्रातील पाणी आटल्याने अशाप्रकारे माशांचा देखील तडफडून मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीवरील निम्न उच्च पाणी पातळी बंधारा गेल्या वीस वर्षांपासून कधीही कोरडाठाक पडला नव्हता. मात्र यंदा प्रथमच हे चित्र पाहण्यास मिळत आहे. 

Jalna Water Scarcity
'आमच्या लेकीचा जीव घेतला', विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्यांवर वडिलांचा आरोप | Jalna

२५ गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत 

यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नाथसागर १०० टक्के भरला असतानाही आज नाथसागरातील पाणी पातळी ५० टक्केच्या आसपास आहे. तरी देखील शहागड कोल्हापूरी बंधारा, पाथरवाला बुद्रुक निम्न उच्च पाणी पातळी बंधारा पूर्णतः कोरडा झाला आहे. या बंधाऱ्यावर पाथरवाला बु, कुरण, वाळकेश्वर, हिंगणगाव, संगम जळगाव,देवकी, नांदरसह जवळपास वीस पंचवीस गावचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. या परिसरातील विहीर, बोअरवेल आदीं पाणी स्रोत आटले आहे.शेतीतील ऊस, उन्हाळी बाजरी, पपई, नारळ बाग, मोसंबीसह बारमाही पिके धोक्यात आली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com