Nashik Vidhan Parishad election shivsena bjp ncp latest news Saam TV Marathi
महाराष्ट्र

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Nashik MLC Election : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच तिढा निर्माण झाला आहे. जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही उमेदवार मैदानात उतरलेत.

Namdeo Kumbhar

Nashik Vidhan Parishad election latest news : नाशिकची विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांना महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदेंसेनेचे नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित दराडेंनी उमेदवारी अर्ज भरला. पण अर्ज दाखल करण्याआधी काही तास ट्विस्ट आला असून भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतेही मैदानात उतरणार असल्याचे समजतेय.

भाजपकडूनही दावा -

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे माजी नगरसेवक आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते मैदानात उतरणार असल्याचे समजतेय. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्या नगरसेवकांकडे विचारणा होणार असल्याचे समजतेय. कोणाच्या सुचनेनुसार सूचक, अनुमोदक म्हणून सही केली? याबाबत विचारणा करण्यात येणार आहे.

गणेश गीते यांनी भाजप आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत. जागा वाटपात नाशिकची जागा शिवसेनेला, गणेश गीते यांच्या उमेदवारीने निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. प्रदेश पातळीवरून स्थानिक पदाधिकारी, नगरसेवकांना काय सूचना दिल्या जाणार, याकडे लक्ष लागलेय.

भुजबळांचे कट्टर समर्थकही मैदानात -

नाशिकच्या विधान परिषद जागेसंदर्भात महायुतीकडून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीत असून देखील आम्हाला विचारात घेत नसल्याने गोरख बोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समजतेय.

मी महाराष्ट्र सरचिटणीस आहे, सुनेत्रा पवार आणि इतर प्रमुख नेत्यांची बैठक झाली. महायुतीमध्ये आम्हाला कोणी विचारात घेत नाही, त्यामुळे आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छगन भुजबळ आणि इतर नेत्यांसोबत आम्ही चर्चा केली होती, विनंती केली होती, आज अर्ज दाखल केला आहे. आमचे राष्ट्रवादीचे १०७ नगरसेवक आहे. आम्ही अनुमोदक आणि सूचक त्यातले आहे. AB फॉर्मची आम्ही वाट बघतोय, असे गोरख बोडके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT