Vaccination  saam tv
महाराष्ट्र

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

Vaccination news : नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला असून आरोग्य विभागाने विशेष चौकशी सुरू केली आहे.

Namdeo Kumbhar

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात लसीकरणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नाशिकच्या खुटवडनगर येथील लसीकरण शिबिरात १६ वर्षीय श्रावणी पाटील हिने घटसर्प आणि धनुर्वात प्रतिबंधक लस घेतली होती. लस घेतल्यानंतर काही मिनिटांतच ती बेशुद्ध पडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. तिला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. लसीकरणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. प्रशासन सत्य लपवत असल्याचाही आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फॉरेन्सिक आणि वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. चौकशीसाठी विशेष वैद्यकीय पथक नाशिकमध्ये येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यभर लसीकरण मोहीम राबवणाऱ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दहा लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला लसीनंतर गंभीर रिअॅक्शन येऊ शकते, असा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संपूर्ण लसीकरण मोहीम देखील थांबवण्यात आली असून श्रावणीच्या मृत्यूच नेमकं कारण काय? हे अहवालातून स्पष्ट होणार असल्यानं अहवालात नेमकं काय समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

SCROLL FOR NEXT